जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील लोणीत स्कुल बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना दि 24 मार्च 2025 रोजी घडली होती या घटनेत दुचाकीस्वाराचा काल दि 1 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
यायबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील शेंडकर वस्ती लोणी येथे मोटरसायकल आणि स्कुल बसच्या अपघाताची घटना घडली होती ही घटना दि 24 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली होती या घटनेत यातील मृत तरुण नामे बंजरंग बाबासाहेब जगदाळे वय 45 वर्षीय रा.वाकी ता.जामखेड हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ जामखेड येथील हॉस्पिटलमध्ये नेहण्यात आले पण रुगणाची स्थिती गंभीर असल्याने त्यांना पँसिफिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये नेहण्यात आले व तिथे उपाचार सुरू केले व उपाचारादरम्यान बंजरंग बाबासाहेब जगदाळे रा वाकी यांचा दि 1 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे .
सदर अपघात प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला दि.२६मार्च२०२५ रोजी फिर्यादी नामे अशोक बंजरंग जगदाळे वय 25 वर्षे धंदा-शेती,रा.वाकी ता जामखेड यांनी अज्ञात स्कुल बसचालकावर गुन्हा दाखल केला होता
अपघाताच्या तपशिलानुसार, फिर्यादी यांच्या वडिलांनी लोणी फाटा येथून वाकीकडे येत असताना, शेंडकर वस्ती लोणी येथे स्कुल बसच्या चालकाने भरधाव वेगात बस चालवली व स्कुल बस, ज्याचा नंबर MH16 CD 7184 आहे, रस्त्याच्या परिस्थितीला दुर्लक्ष करून चालवण्यात आली होती. या अपघातात फिर्यादीच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली, तर मोटरसायकलला देखील मोठी हानी पोहोचली आहे.
अपघातानंतर, स्कुल बसचा चालक घटनास्थळावरून पळून गेला.व याबाबत फिर्याद खर्डा पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. दाखल करण्यात आली आहे आणि गुन्हा मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली या प्रकरणानुसार स्कुल बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास स.फौ/सय्यद हे करत होते.
परंतु या प्रकरणात फिर्यादीचे वडील नामे बंजरंग बाबासाहेब जगदाळे वय 45 वर्षीय रा वाकी यांचा मृत्यू काल दि 1 एप्रिल रोजी झाला असून त्यांचा मृतदेह रुग्णवाहिके मध्ये घेऊन डायरेक्ट खर्डा पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आले व सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करावी व त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या दालनात जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा मृताच्या कुटूंबाने व वाकी ग्रामस्थांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिला आहे.
तसेच मृताचे नातेवाईक व यातील फिर्यादी मुलगा अशोक बंजरंग जगदाळे वय 25 ,रा.वाकी ता जामखेड यांनी खर्डा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दि 24 मार्च रोजी केला होता पण पोलिसांनी ह्या तपासाकडे कमालीचे दूर्लक्ष केले आहे घटनास्थळी पंचनामा देखिल झाला नाही, पोलिसांचे व आरोपीचे आर्थिक देवाणघेवाण झाले असल्याचे मृतांच्या कुटुंबाचा आरोप आहे.सदर मृताच्या नातेवाईकांनी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना सदर प्रकरणाच्या तपासा बाबत दिरंगाई का केली आहे असे विचारल्यास झंजाड यांनी सांगितले की आम्ही ऑनलाइन पंचनामा केला आहे पण तपासी अंमलदार स.फौ/सय्यद हे सुट्टीवर आहेत.म्हणून आरोपीचा तपास करता आला नाही.
पोलिसांच्या उलटसुलट उत्तरांमुळे मृताचे कुटुंब व वाकी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत व न्यायची मागणी करत आहेत, जर त्या स्कुल बस चालकावर कारवाई केली नाही खुनाचा गुन्हा दाखल केला नाही तर आहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या दालनात जाऊन उपोषण करण्याचा इशारा फिर्यादि व वाकीच्या ग्रामस्थांनी दिला आहे .
कोट
सदर घटनेने खर्डा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने पोलीस स्टेशन नेमके कोणासाठी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वसामान्य नागरिकांची दखल जर पोलीस स्टेशन घेत नसले तर न्याय तरी कोणाकडे मागायचा असा प्रश्न?नागरिकांमधून उपस्थित झाला आहे. सदर मृतला न्याय मिळणार का? की दिरंगाई करणाऱ्या पोलीसांवर वरिष्ठांकडून कारवाई होणार? अशी चर्चा खर्डा हद्दीत सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा