खर्डा प्रतिनिधी /१एप्रिल2025
जामखेड तालुक्यातील नाहूली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2025 ते 2030 सार्वत्रिक निवडणुकी मध्ये विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या दहा जागा बिनविरोध करत विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक सचिन घुमरे यांनी बाजी मारली होती. तसेच उर्वरित तीन जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांचे डिपाँजिट जप्त केले होते. यामुळे सहकारातील दिग्गजांना मोठा धक्का मानला जात आहे.
दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीमध्ये चेअरमन पदी मगन शामराव बहिर यांचा व व्हईस चेअरमनपदी अर्जुन गर्जे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी टी. पी टेकाळे यांनी काम पाहिले व सहाय्यक म्हणून नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव अशोक भिलारे यांनी काम पहिले.
जामखेड तालुक्यातील नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवातीला नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या तसेच विरोधकाच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने दहावी जागाही आली राहिलेल्या तीन जागेसाठी निवडणुक झाली या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने तीनही उमेदवार विजयी झाले यामुळे एकुण तेरा च्या तेरा जागांवर विजय मिळवला.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या नेतृत्वाखाली दिग्गजांचा पराभव केला होता. पराभव जिव्हारी लागल्याने नाहुली येथे वाद निर्माण झाले होते. नाहुली सोसायटीच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल करून निवडणुक लढलेले कार्यकर्ते मार्केट कमिटी संचालक सचिन घुमरे आणि मार्केट कमिटी माजी संचालक काकासाहेब गर्जे यांनी दिग्गजांना धुळ चारत निवडणुकीत १३-० ने यश मिळवलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा