कर्जत प्रतिनधी/१एप्रिल२०२५
आहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत एक महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे करपडी फाटा, राशीन येथून शिवाजी विजय देवकाते रा.भिगवन, जि.पुणे याला विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 32,000 रुपयांचे गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईत दिनेश आहेर यांनी पथकाच्या सहायकांसह मार्गदर्शन केले व दिनांक 28 मार्च 2025 रोजी, करपडी फाटा, एसटी स्टॅण्ड, राशीन ता.कर्जत येथे जाऊन शिवाजी विजय देवकाते, वय 34, रा.मदनवाडी, भिगवन, ता.इंदापूर, जि.पुणे यास ताब्यात घेतले.व आरोपी शिवाजी विजय देवकाते याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.
सदर गुन्ह्याबाबत आरोपीकडे अग्निशस्त्र व काडतुसबाबत विचारपूस केली असता त्याने इसम नामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे, रा.जवळा, ता.जामखेड (फरार ) याचे कडून अग्निशस्त्र व काडतुस आणलेबाबत माहिती सांगीतली आहे. त्यांच्याविरुद्ध अधिक पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा