खर्डा प्रतिनधी 29 एप्रिल2025
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे उन्हाळ्याच्या तडाख्याच्या काळात वीजपुरवठ्यातील अनियमितता नागरिकांना त्रस्त करीत आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता तर दुसरीकडे विजेची भरदुपारी तासोंतास वीज जाणे याकारणाने खर्डा भागातील
ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
वीज सारखी ये-जा करत असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यातही त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण अधिकाऱ्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. जर खर्डा येथे एखाद्या ठिकाणी वायर तुटल्याने वीज गेली असेल, तर वायरमन तब्बल चार-पाच तासांनंतर दुरुस्तीसाठी येतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व वयोवृद्ध नागरिकांना या गोष्टींचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.तसेच खर्डा येथील नागरिकांना वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे मोठा त्रास होत आहे. वीज सारखी ये-जा करत असल्याने घरगुती कामे, व्यवसाय आणि शिक्षण या सर्व गोष्टींवर परिणाम होत आहे. वीज महावितरण अधिकाऱ्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून वीज गेल्यानंतर वायरमन दुरुस्तीसाठी खूप वेळ लावतात, ही बाब नागरिकांना खूप त्रासदायक वाटत आहे.नागरिकांनी स्थानिक वायरमनला फोन केला तर वायरमन त्यांचे फोन पण घेत नसल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर वीजपुरवठ्यातील अनियमिततेचा मोठा परिणाम होत असून वीज नसल्याने घरातील उपकरणे वापरणे शक्य होत नाही, शिवाय व्यवसायही बंद पडतो. नागरिकांना या समस्येच्या निराकरणासाठी वीज महावितरण अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळायला हवा
वीजपुरवठ्यातील अनियमितता दूर करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देऊन समस्या सोडवणे गरजेचे असून या समस्येचे निराकरण झाल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे वीज महावितरण अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा