खर्डा प्रतिनधी१६ एप्रिल२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील दिघोळच्या निर्मळवस्ती येथे मोठी चोरीची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आरोपींनी विना नंबरच्या टेम्पोमध्ये गोठ्यातील जनावरे चोरी करून पळताना पाहिले आहे. या घटनेत आरोपी तुषार एकनाथ रावसाहेब पवार वय(१९)रा.जामखेड सदाफुलेवस्ती२)धनंजय शिंदे रा.गंभीरवाडी ता वाशी जि.धाराशिव पूर्ण नाव माहीत नाही आणि 3)अनोळखी व्यक्ती नाव गाव माहीत नाही यांनी निर्मळवस्ती दिघोळ येथे दि १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ०२.१५ ते ०३.३३ वाजेच्या दरम्यान घडली आले आहे. आरोपींनी विना नंबरच्या टेम्पोमध्ये जनावरे घालून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणात आरोपींविरुद्ध कलम ३०३(२), २८१, आणि ३२४ (५) अंतर्गत खर्डा पोलीस स्टेशनला दि 15 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना अटक झाली नसून आरोपी फरार आहेत
सदर घटनेबाबत फिर्यादी रामहरी एकनाथ निर्मळ वय55 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड यांच्या गोठ्यातील जनावरे टेम्पोमध्ये घालून चोरी केल्याचा फिर्यादीत नमूद केले आहे. यामध्ये १,८०,०० रुपये किंमतीच्या म्हशी व१०,००० रु किंमतिचे वगारु चोरी करून नेल्याचा प्रकरणात फिर्यादी रामहरी एकनाथ निर्मळ रा.दिघोळ यांनी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
खर्डा हद्दीत गोठ्यातूनच जनावरांची चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा