जामखेड प्रतिनधी/३एप्रिल२०२५
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आठवडाभरापूर्वी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रगतशील शेतकरी हरिभाऊ गणपत ढवळे यांच्या शेतीला भेट दिली. यावेळी त्यांनी कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा थेट आढावा घेतला आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीची प्रशंसा केली. हरिभाऊ ढवळे यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केला आहे, ज्यामुळे त्यांची शेती अधिक उत्पादक बनली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनांचा लाभ घेत हरिभाऊ ढवळे यांनी शेतीमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लकी ड्रॉद्वारा या योजनांचा लाभ त्यांना मिळाला. डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. ते म्हणाले, “पाणीसंवर्धन, फलोत्पादन आणि आधुनिक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर केल्यास शाश्वत शेतीसाठी मोठा फायदा होईल. इतर शेतकऱ्यांनीही या योजनांचा लाभ घ्यावा.” यावेळी कर्जत उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अशोक शेळके आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा