अहिल्यानगर प्रतिनधी/4एप्रिल2025
अहिल्यानगर जिल्हा गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाच्या प्रभावाखाली आहे. या काळात अचानक पडणारा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्व नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील अनेक भागांत विजेसह अनपेक्षित पाऊस पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, बर्याचदा वातावरणातील अचानक बदल शेतकरी समुदायावर परिणाम करत आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना मोठे नुकसान झाले आहे. नगर शहरासह कर्जत, जामखेड,पारनेर, अकोले, राहुरी, नेवासा, पाथर्डी, आणि शेवगाव अशा तालुक्यांत जोरदार आणि रिमझिम पाऊस पडला. यामुळे कांदा, ऊस, आंबा यांसारख्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा