जामखेड प्रतिनधी/५ एप्रिल२०२५
काल दि शुक्रवारी रोजी रात्री जामखेड येथील कॅनरा बँकेतील एका धक्कादायक प्रकारात, खातेदारांनी बनावट सोन्याची दागिने तारण ठेऊन १७ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणात गोल्ड व्हॅल्युअर, खातेदार मुनावर अजीम खान पठाण, अनिता संतोष जमदाडे आणि दिगांबर उत्तम आजबे यांच्यासह चार जणांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहिती नुसार कॅनरा बँकेच्या जामखेड शाखेत 2018 पासून गोल्ड व्हॅल्युअर म्हणून आण्णासाहेब नामदेव कोल्हे कार्यरत होते. या बँकेत खातेदारांनी 21 ऑक्टोबर 2024 रोजी सोन्याच्या 4 बांगड्या, 4 नग अंगठ्या अशी एकूण 100 ग्रॅम सोने असलेली दागिने तारण ठेवून कर्ज घेतले. त्यानंतर, अनिता जमदाडे आणि दिगांबर आजबे यांनीही त्यांच्या वेळी सोन्याची दागिने तारण ठेऊन मोठ्या रकमेचे कर्ज घेतले. बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुरुवातीला या दागिन्यांची तपासणी झाली असताना, ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले, ज्यानंतर या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
जामखेड पोलिसांनी या प्रकरणात प्राथमिक चौकशी केल्यानंतर, तीन जणांना रात्रीच अटक केली असून कॅनरा बँकेच्या जामखेड शाखेतील मॅनेजर आनंद बाबासाहेब डोळसे यांनी या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे. ही फसवणूक जामखेडेतील बँकिंग आणि सुरक्षा प्रणालीच्या कमकुवततेचा प्रत्यक्ष पुरावा आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा