खर्डा प्रतिनधी/6 एप्रिल2025
जामखेड तालुक्यातील खर्डा, येथे एक धक्कादायक घटना घडली.आहे खर्डा येथील वैजीनाथ पोपटराव पाटील यांना लाकडी दांडके, लोखंडी पाईप, व लाथाबुक्यांचा वापर करून मारहाण करण्यात आल्याची घटना दि 4 एप्रिल 2025 रोजी रात्री 11 वाजता साई दर्शन खानावळजवळ खर्डा येथे घडली आहे. यातील आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांचा वापर करून खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की या घटनेत10 आरोपींचा समावेश आहे. त्यातील काही आरोपी 1.गहिनीनाथ मुकुंद खरात 2.श्रीकांत भिमराव लोखंडे 3.बारक्या नवनाथ खरात 4.मुकुंद खरात 5. संभाजी केरु खरात 6.ओकांर परमेश्वर इंगळे 7.संजीवनी संभाजी खरात 8.पुजा गहिनीनाथ खरात 9.सविता बाळासाहेब खरात व 10. अनोळखी पुरुष सर्व रा. शुक्रवार पेठ खर्डा ता.जामखेड जि. अहिल्यानगर या सर्वांवर भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत विविध गुन्ह्यांची दंडकें दाखल करण्यात आली आहेत.
यातील आरोपींनी मिळून लाकडी दांडके, लोखंडी पाईप, आणि लाथाबुके वापरून फिर्यादी वैजीनाथ पाटील यांना जबर मारहाण केली. व आरोपी क्रमांक1)गहिनीनाथ मुकुंद खरात 2.श्रीकांत भिमराव लोखंडे यांनी नांचाक्स** ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपी क्र.3 बारक्या नवनाथ खरात याने अवघड जागेवर पोटात लाथा भरण्यात आल्या आणि काठीने मारहाण केली. आरोपी क्र.6ओकांर परमेश्वर इंगळे याने फिर्यादीस लाथा व चापटाने मारहाण करुन जिवे मारुन टाका अशी धमकी दिली असे फिर्यादी वैजीनाथ पाटील यांनी फिर्यादी मध्ये नमुद केले असून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. 64/2025 नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत कलम 109(1),118(1),115(2), 351(2)(3),189(2),191(2),191,(3),190 वापरून खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी वैजीनाथ पाटील गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर जामखेड येथील पन्हाळकर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कोट
वैजीनाथ पाटील हे तालुका जामखेड येथील बाजार समितीचे संचालक आहेत, तसेच ते खर्डा गावच्या सरपंच सौ. संजविनी पाटील यांचे पती आहेत. ह्या घटनेने स्थानिक राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना मागील कट रचणाऱ्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न पडत आहेत. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली नसून आरोपी मात्र मोकाट असल्याने खर्डा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे, आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा