जामखेड प्रतिनिधी6 एप्रिल2025
जामखेड शहरातील तपनेश्वर येथील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी रामनवमी ते हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते सकाळी विना पूजन करून सप्ताह प्रारंभ झाला.
गेली अनेक वर्ष हनुमान जयंती निमित्त जामखेड येथील हनुमान मंदिर तपनेश्वर रोड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक मान्यवरांची कीर्तने, प्रवचने, काकडा, हरिपाठ, गाथा भजन, दासबोध ग्रंथाचे पारायण, रात्री हरीजागर व अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
रविवारी सकाळी तहसीलदार गणेश माळी व त्यांच्या पत्नी सौ. माळी यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली. त्यानंतर टाळ विना मृदंगाची पूजा करून भजन करून सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी हनुमान मंदिर ट्रस्टचे सचिव कल्याण घायाळ विश्वस्त ज्ञानेश्वर अंदुरे, योगिता देशमुख, प्रताप वीर, डॉ. बांगर, गणेश मासाळ, ज्ञानेश्वर भोसले किरण सोनवणे संतोष लवांडे सचिन देशमुख, राऊत सर, दादासाहेब महाराज सातपुते, संतोष राळेभात पाटील, सौ कल्याणी मासाळ उपस्थित होते.
सकाळी दहा ते बारा यावेत ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. सायंकाळी बबा महाराज ढवळे यांचे कीर्तन झाले,सोमवारी ह. भ. प. विजय महाराज बागडे सर, मंगळवारी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पवणे, बुधवारी ह. भ. प. अशोक महाराज भाकरे, गुरुवारी ह. भ. प. राजेंद्र महाराज झेंडे, शुक्रवारी ह. भ. प. लखन महाराज पवार, शनिवारी ह. भ. प. डॉ. अमित महाराज डोके, यांची कीर्तने होतील. दरम्यान शनिवारी सप्ताह निमित्त जामखेड शहरातून ग्रंथ दिंडी निघेल.
रविवारी सकाळी ह. भ. प. पांडुरंग महाराज लोमटे यांचे काल्याचे किर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा