खर्डा प्रतिनिधी/७एप्रिल२०२५
राज्यातील रस्त्यांची कोंडी सोडवण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तरडगाव येथे सभापती राम शिंदे यांनी खर्डा, सोनेगाव रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.राम शिंदे यांनी हे निर्देश खर्डा आणि सोनेगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी दिले आहेत, ज्यामुळे या भागातील नागरिकांचे दिवस सुखावतील.
या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वंजारवाडी तरडगावचे सरपंच डॉ. जयराम खोत, सोनेगावचे सरपंच डॉ. विशाल वायकर यांनी सभापती राम शिंदे यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याच्या दखलेच्या माध्यमातून हा रस्ता लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास या भागातील लोकांना वाटत आहे.
नान्नज ते खर्डा या रस्त्यासाठी गेल्या वर्षी प्रशासकीय मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली होती, मात्र संबंधित ठेकेदार आणि काम बंद करण्याने रस्ता पूर्ण न झाल्याने तेथे खडी वखरली असून ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. या रस्त्याची अवस्था बेकार असल्याने शेतीमालाच्या वाहतुकीतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीय गरजूंना वाहतूक करणेही आव्हानात्मक झाले आहे.
राम शिंदे यांनी या कार्यक्रमात संबंधित अधिकाऱ्यांना काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्याने या भागातील लोकांची होणारी परवड संपणार असल्याची आशा आहे. तरडगाव येथील या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, नानासाहेब गोपाळघरे, गणेश लटके, सचिन घुमरे, बाळासाहेब गोपाळघरे, केशव वनवे, अँड.सुभाष जायभाय, महालिंग कोरे, महेश दिंडोरे, भागवत सुरवसे, गणेश नेहरकर, गणेश काळे, इत्यादी सह वंजारवाडी, तरडगाव, सातेफळ, सोनेगाव, धनेगाव येथील सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचाय सदस्य,कार्यकर्ते व ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा