आहिल्यानगर प्रतिनधी/७एप्रिल२०२५
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण व्यवस्थेतील बदलांना वेग येत आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांनी कर्जत आणि जामखेड तालुक्यातील १११ शाळांमध्ये 'डिजिटल स्कूल' या संकल्पनेची पूर्तता होत आहे. या शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअर दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, "आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डिजिटल शिक्षण आवश्यक आहे. असे शिक्षण म्हणजे केवळ एक दिशादर्शक नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सीमांना दूर करणारा साच आहे." प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमातून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या आत्मविश्वास वाढवण्याची बाब प्रा. राम शिंदे यांनी अनेकदा अधोरेखित केली आहे.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट असलेल्या या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली. स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल सामग्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासाठी रंगात्मक आणि चित्रकात्मक पद्धतीचा वापर केला जात आहे, ज्यामुळे त्यांना शाळेतील शिक्षणाचा उत्साह वाढतो. प्रा. राम शिंदे यांच्या मतानुसार, डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अनुकूल परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षक, पालक आणि सर्व जणांच्या सहकार्याची गरज आहे. याचा अर्थ, केवळ शिक्षकांनीच नव्हे तर पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
विद्यार्थ्यांनी साधला सभापतींशी संवाद:
कार्यक्रमादरम्यान इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशी संवाद साधला. इंटरॅक्टिव्ह टच पॅनलबाबत शिक्षकांनी दिलेल्या माहितीमुळे त्यांना सर्व विषय समजण्यास मदत झाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे संस्कृत सारखे विषय देखील डिजिटल माध्यमातून समजून घेण्यास सोपे होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा