कर्जत प्रतिनधी/८एप्रिल२०२५
राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणांची रेलचेल सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का दिला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित पवारांनी भाजपच्या पॅनलचा पराभव केला होता. त्यानंतर उषा राऊत ह्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा बनल्या होत्या. आता भाजपच्या राम शिंदेंनी अविश्वास प्रस्तावाच्या मार्गाने रोहित पवारांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावला आहे.
कर्जत नगरपंचायतीतील 17 नगरसेवकांपैकी 13 जणांनी राष्ट्रवादीच्या उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या घडामुडीमुळे रोहित पवारांच्या नेतृत्वाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी गुप्तपणे राम शिंदेंसोबत बैठक घेतली आहे, त्याच्या वृत्ताला राम शिंदेंनी दुजोरा दिला आहे. ही बैठक कर्जत-जामखेडच्या राजकारणात नव्या वळणाची नांदी घालणार आहे.
कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे 12, काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक आहेत. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलचा पराभव केला होता. आता राम शिंदेंनी विधानपरिषदेचे सभापती म्हणून सत्तेच्या स्थितीतून रोहित पवारांच्या गडाला सुरुंग लावला आहे. कर्जत-जामखेडच्या राजकारणाची दिशा या उलथापालथीनंतर ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा