जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भरदिवसा शासकिय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासकीय इमारती पाडून तसेच सदरचे इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या व सागवानी लाकडे व शासकीय मालमत्तेचा अपहार करुन नमुद सर्व शासकीय इमारती पाडुन अंदाजे २० लाख रुपयाचे नुकसान करुन सदर ठिकाणचे गाळेधारकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांचे गाळे जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दि 22 मार्च2025 रोजी फिर्यादी तहसील कार्यालयाचे अतिरिक्त पुरवठा निरीक्षक तथा मंडळ अधिकारी विजय बापुराव चव्हाण (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 49/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(1), 331(3), 331(5), 308(2), 314, 324(2), 351(2), 351(3), 352, 329, 3(5),सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनीयम कलम-3 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंड ऍक्ट कलम -7 नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी ज्योती गोलेकरसह चार जणांवर खर्डा पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असुनही एक महिना उलटूनही अध्यापही आरोपींना अटक न केल्याने खर्डा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांनी आज दि. 22एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहिल्यानगर येथे खर्डा ग्रामस्थांच्या वतीने अर्ज देण्यात आला आहे . नमुद अर्जामध्ये यातील आरोपी नामे ज्योती शिरीष गोलेकर, तीचा मुलगा संग्राम शिरीष गोलेकर, जे.सी.बी.मालक सुमित सुधीर चावणे तिघेही रा.खर्डा ता.जामखेड व जेसीबी चालक तुकाराम आत्माराम सुरवसे रा.गवळवाडी ता.जामखेड या आरोपींच्या तपासात स्थानिक पोलिसांनी ढिलाई केली असून त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह खर्डा ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. तरी सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी म्हणून आपण सूचना देण्यात यावे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अर्जदार अनिल मोहन खेडकर, उमेश गुरसाळी, , संभाजी रघुनाथ भोसले, शिवाजी भोसले व खर्डा ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मते, आरोपींनी खोटी व अर्थहीन माहिती देऊन न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मिळविन्याचा प्रयत्न केला असून, याबाबत जिल्हा सत्र न्यायालयाने हा तात्पुरता जामीन रद्द करण्यासही सांगितले आहे. तरीही पोलीस तपासात ढिलाई करत आहेत, ज्यामुळे आरोपी अजूनही मोकाटच आहेत. त्यामुळे खर्डा ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अर्जाद्वारे त्वरीत आणि निष्ठावान चौकशी करून सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विनंती केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा