चोंडी प्रतिनधी/२२एप्रिल२०२५
अहिल्यानगरमधील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसंबंधी निविदा रक्कमेच्या जाहिरातीबाबत गैरसमज निर्माण झाल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. २१ एप्रिल २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील रक्कम १.५ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट असून, काही वृत्तपत्रांत १५० कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आल्याचा चुकीचा अर्थ तयार झाला आहे. यामुळे संबंधित वृत्तपत्राच्या मुद्रणातील त्रुटीमुळे हा गैरसमज पसरण्याचे कारण आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीत टिंब (शून्ये) चुकून कमी झाल्याने १.५० कोटी रुपयांच्या जागी १५० कोटी रुपयांचे रक्कम दिसल्याचा खुलासा झाला आहे. या चुकीमुळे काही व्यक्तींनी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली आणि काही वृत्तपत्रांनीही त्यावर आधारित बातम्या प्रसिद्ध केल्या. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाच्या अधिकृत आदेशानुसार जाहिरातीची रक्कम योग्य प्रकारे अंकित करण्यात आलेली आहे आणि फक्त एका वृत्तपत्राच्या मुद्रणातील दोषामुळे अशी गैरसोय झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने भविष्यात याप्रमाणे अशा जाहिरातींमध्ये निविदा रक्कमेचे अंक आणि अक्षरं दोन्ही नमूद करण्याचा निर्देश दिला आहे, ज्यामुळे पुढील वेळेस कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही, असेही विभागाने नमूद केले आहे. यामुळे शासनाची प्रतिमा किंवा जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होण्यापासून बचाव होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा