जामखेड प्रतिनधी/१५एप्रिल२०२५
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांनी मिळून दिल्लीमध्ये १३४ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ता संजय कोठारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जागतिक वैभवाची आणि त्याच्या सामाजिक सुधारणांची प्रशंसा केली. या वेळी सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्वे उपस्थित होते.
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन जैन कॉन्फरन्स दिल्लीच्या सहकार्याने झाले होते. प्रारंभी बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांनी प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संजय कोठारी यांनी जातीपातीच्या भेदभाव न करता सामाजिक निर्मिती आणि सेवा कार्यात सतत योगदान दिल्याबद्दल बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांनी त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमात बौद्धाचार्य अशोक आव्हाड, नोटरी पब्लिक ॲडवोकेट सुमतीलाल बलदोटा, महावीर सुराणा, संकेत कोठारी, बौद्धाचार्य पत्रकार संजय वारभोग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनील जावळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद नगर येथील युवा कार्यकर्ते दिपक घायतडक उपस्थित होते.
यावेळी बौद्धाचार्य अशोक आव्हाड हे म्हंटले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांची जयंती संपूर्ण शहरात उत्साहाने साजरी केली जात आहे." प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी नेहमीच डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परंपरा जागृत ठेवली आहे आणि त्यांच्या सामाजिक सेवेचे आभार बौद्ध धर्मिय समुदाय व्यक्त करतो. त्यांनी कधीही जात-पात पाहत नाही आणि समाजकारणात नेहमी पुढे राहतात, असे प्रा. राहुल अहिरे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व आदर्श शिक्षक बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, बौद्धाचार्य अशोक आव्हाड, नोटरी पब्लिक ॲडवोकेट सुमतीलाल बलदोटा, महावीर सुराणा, संकेत कोठारी,नगरव्हिजनचे संपादक बौद्धाचार्य पत्रकार संजय वारभोग,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनील जावळे सर,स्नेहालयाचे समन्वयक योगेश अब्दुले,सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक, प्रा.राहुल आहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद नगर येथील युवा कार्यकर्ते दिपक घायतडक, संभाजी आव्हाड,सदाफुले आदी उपस्थित होते.
कोट
कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्स हे गेल्या अनेक वर्षांपासून महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वृक्षारोपण, शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक आणि गणवेश वाटप यासारख्या विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा