जामखेड प्रतिनधी/१५एप्रिल२०२५
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करून शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करून मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य मडके बी के यांनी केले.विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख नवनाथ बडे प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक महेश पाटील, स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर ,प्रा मधुकर आबा राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, विनायक राऊत ,प्राचार्य मडके बी के, उपमुख्याध्यापक नाळे एस ,पर्यवेक्षक कोकाटे विकास ,अमोल बहिर ,अशोक यादव , केशवराज कोल्हे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने ,रघुनाथ मोहोळकर ,साळुंखे बी एस एनसीसी ऑफिसर मयुर भोसले.विद्यार्थी शिक्षक ,माता पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन करताना शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र आंबेडकरांनी दिला.तसेचडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सोप्या भाषेत मार्गदर्शन करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी डॉक्टर आंबेडकर यांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहे .त्यांनी आपले सर्व जीवन समाजासाठी समर्पण केले होते. असे मनोगत व्यक्त केले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मनोगतात
विद्यार्थ्यांचा बौद्धिक मानसिक शारीरिक विकास घडवण्याचे केंद्र नागेश विद्यालय आहे या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी पूर्वतयारी आहे व यशाकडे जाण्याची पायाभरणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आत्मसात करून विद्यार्थ्यांनी यशाकडे वाटचाल करावी. असे मनोगत व्यक्त केले
यावर्षीचे एन एम एम एस चे 40 विद्यार्थी आर टी एस 2 विद्यार्थी व मागील वर्षाचे एन एम एम एस 52 व स्कॉलरशिप चे 12 विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मार्गदर्शक करणारे शिक्षक प्राचार्य मडके बी के , एन एम एम एस प्रमुख सोमनाथ गर्जे, आर टी एस विभाग प्रमुख अशोक सांगळ, स्कॉलरशिप विभाग प्रमुख संतोष पवार ,ज्ञानेश्वर लटपटे ,अशोक चौधरी, श्रीमती ढाकणे एस एस, निलेश अनारसे ,कृष्णा मुरकुटे रणदिवे एस आर ,गोपाल बाबर ,साईप्रसाद लोखंडे, शंकर गुट्टे या शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. नान्नज मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चे संचालक बळीराम मेहेर, विजय रेणुके, अशोक चौधरे यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल विद्यालयाला सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख नवनाथ बडे यांनी डॉ आंबेडकर यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासासात सातत्य ठेवावे. व महापुरुषांचे नेहमी स्मरण करावे असे मनोगत व्यक्त करून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे सोमीनाथ गर्जे तर आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा