खर्डा प्रतिनधी/१४एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा बुद्धीविहार येथे भीमसैनिकांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस १४ एप्रिल रोजी, भारतात आणि जगभरात एकत्रितपणे साजरा केला जातो, ज्यामध्ये विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. खर्डा येथील ग्रामस्थांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला दीप प्रज्वलन आणि फुलांचा अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
त्यानंतर सरपंच संजीवनी पाटील, रवींद्र सुरवसे आणि विजयसिंह गोलेकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी उपस्थित लोकांनी भावपूर्ण मनोगते व्यक्त करून त्यांना आदरांजली अर्पण केली. ग्रामपंचायतच्या वतीने जयंती उत्सव समितीला संपूर्ण मंडप सेटअपचे भेटवस्तू देण्यात आले, तर आमदार रोहित पवार यांच्या वतीने ११ हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी १५ एप्रिलला भव्य मिरवणूक आयोजित केली जाणार असून, सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत कांबळे यांच्याकडुन करण्यात आले
यावेळी या कार्यक्रमात सरपंच सौ.संजविनी पाटील, माजी. सरपंच शिवकुमार गुळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र सुरवसे,ग्रामपंचायत अधिकारी बहिर भाऊसाहेब, मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, भागवत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, डॉ. सोपान गोपाळघरे, राजू मोरे, महेश दिंडोरे, दीपक जावळे, दत्तात्रय भोसले, राजन शेठ शहा, पत्रकार दत्तराज पवार, आशुतोष गायकवाड, बाळासाहेब शिंदे, किशोर दुशी, अनिल धोत्रे, भीमा घोडेराव, प्रशांत कांबळे इत्यादी सह खर्डा ग्रामस्थ व सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमा घोडेराव यांनी केले, तर आभार प्रशांत कांबळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा