खर्डा प्रतिनधी/१४एप्रिल२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या विशेष निमित्ताने 'डिजिटल खर्डा ग्रामपंचायत' ही वेबसाईट लक्षणीय उत्साहाने आज लॉन्च केली आहे या निमित्ताने आज दि 14 एप्रिल रोजी ग्रामपंचायत खर्डा येथे लॉन्च करण्यात आली.यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि जयंती मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली.
वेबसाईटवरून खर्डा शहरातील विविध दाखले आणि माहिती नागरिकांना मिळणार , तसेच टेंडर माहिती, विविध ग्रामपंचायत अंतर्गत असणारे कामे , नागरिकांना सोप्या पद्धतीने माहिती होणार असल्याची माहिती ग्रामसेवक बबन बहिर यांनी सांगितली आहे. या कार्यक्रमाला सरपंच सौ.संजीवनी वैजीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, राजू मोरे, महालिंग कोरे, डॉ. सोपान गोपाळघरे, महेश दिंडोरे, पत्रकार श्वेता गायकवाड, संतोष थोरात, बाळासाहेब शिंदे, अनिल धोत्रे, धनसिंग साळुंके आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतासह जगभरात साजरी केली जाते. हा दिवस सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढा दिल्याबद्दल ओळखला जातो. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणजे समता व सामाजिक सुधारणेची सुरुवात. याच निमित्ताने खर्डा ग्रामपंचायतने डिजिटल क्रांतीची सुरुवात करून नागरिकांना सुलभतेने सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे.
सरपंच- संजविनी पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा