जामखेड प्रतिनधी/१४एप्रिल२०२५
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी संपूर्ण देशभर सर्व जण उत्साहाने तयारी करतात. यातून एक योग्य तरीका म्हणजे समाजाला जोडून घेण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणे. नुकत्याच सदाफुले वस्ती येथे आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध युवा नेते विकीभाऊ सदाफुले यांच्या कुटुंबाकडून भिमजयंती निमित्त खीरदान आणि गोडधोड जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महामानव डाॅ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी मान्यवरांमध्ये पोलीस निरीक्षक महेश पाटील, भाजपचे जेष्ठ नेते प्रा.मधुकर (आबा) राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे अँड.अरुण (आबा) जाधव, वकील आणि बार आसोशियचे अध्यक्ष अँड.प्रमोद राऊत, डाॅ.सुशिल पन्हाळकर, भिमटोला ग्रुपचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, भिमजयंती 2022 चे अध्यक्ष राजेंद्र (तात्या) सदाफुले, 2023 चे अध्यक्ष राजन समिंदर सर, डाॅ.विक्रांत केकाण, डाॅ.आबेद जमादार, डाॅ.विकी दळवी, सचिन (जाॅकी) सदाफुले, प्रमोद सदाफुले, सचिन गौतम सदाफुले, मच्छिंद्र जाधव, संतोष पवार, अरविंद जाधव, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. विकीभाऊ सदाफुले यांनी सांगितले की भिमजयंती ही केवळ तारखेतच मर्यादित न राहता ती नेहमी मनात राहावी आणि घराघरात सणासारखी साजरी व्हावी.
यावेळी मान्यवरांना निळी टोपी आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कुटुंबातील माजी मंडलाधिकारी मुरलीधर सदाफुले, माजी उपसभापती सुशीलकुमार सदाफुले, विकीभाऊ सदाफुले, सनी प्रिन्स सदाफुले, आनंदराज सदाफुले, मयुरनाना सदाफुले, व इतर मित्र परिवार या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम अधिक परिपूर्ण झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा