जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या श्री संत ज्ञानेश्वर सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आदर्श आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, असे श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. महेश गोलेकर बोलत होते. ते म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांनी भारतीय संविधानातून देशातील वंचित, दलित, शोषित घटकांबरोबरच सर्व समाज घटकांना समान न्याय व संधी मिळाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नेते नव्हते तर समानता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम करणारे दूरदर्शी होते, असे पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड यांनी यावेळी सांगितले." श्वेता गायकवाड यांनीभीमराव आंबेडकरांच्या योगदानाचे विशेष उल्लेख केले आणि ते प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते असे सांगितले.याप्रसंगी श्वेता गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड या होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. महेश गोलेकर यांच्याकडून संपादिका श्वेता गायकवाड यांना महाविद्यालय विकास समितीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित महाविद्यालय प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रसेन आवारे, प्राचार्य प्रा. चंद्रकिशोर बारटक्के, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, उपाध्यक्ष प्रकाश गोलेकर, पत्रकार दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, धनसिंग साळुंखे आदी याप्रसंगी उपस्थित होत. कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवानंद जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शेख मोहसीन यांनी केले.
कोट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि प्रेरणादायी विचारांची जयंती आज श्री संत गजानन महाविद्यालय येथे साजरी झाली असून प्रत्येक शाळा व महाविद्यालयात अश्या प्रेरणादायी विचारांचा जागर करून जयंती साजरी करावी संस्थेचे सचिव डॉ.महेश गोलेकर यांनी यावेळी आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा