नेवासा प्रतिनधी/१३एप्रिल२०२५
नेवासा शहराच्या प्रतिबंधित गुटखा आणि मावा विक्रेत्यांवर नेवासा पोलिसांनी रविवारी दिवशी (दि. १३) एका धाडसी, गुप्त कारवाईत 2 लाख 74 हजार 50 रुपयांचा माल जप्त केला. या कारवाईत पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी वेषांतर करून शहरात टेहाळणी केली आणि मावा-गुटखा तयार करणाऱ्या आठ जणांवर अचूक धाडी टाकून त्यांच्याकडे मोठा साठा आणि मशिनरी जप्त केली. ही कारवाई गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित होती.
परवेज इसाक शेख, वसीम मोहम्मद शेख, सुलेमान इसाक मनियार, अब्दुला अल्ताफ सय्यद, यासीन बाबा शेख, सय्यद अजीम सलीम, जावेद फज्जु शेख आणि अफरोश युसुफ शहा हे प्रामुख्याने नेवासा खुर्द येथील विविध भागांत मावा-गुटखा बनवून ते विक्री करत होते. गुप्त नियोजनानंतर, पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी १२ पोलीस पथकांसह ही कारवाई यशस्वी केली आहे
सुगंधित तंबाखू, मावा तयार करण्याचे मशीन, कच्चा आणि पक्का माल जप्त करण्यात आला. कायदेशीर कारवाई दरम्यान भारतीय दंड संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम २६, २६(२), २७(३)(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या यशस्वी कारवाईत सपोनि अमोल पवार, पोसई संदीप ढाकणे, विजय भोंबे, विकास पाटील, मपोसई श्रद्धा वैद्य, सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे, पोलीस हवालदार अजय साठे, संतोष राठोड, शहाजी आंधळे, सुधाकर दराडे, महिला पोलीस हवालदार संगिता पालवे, पोलीस नाईक किरण पवार, संजय माने यांच्यासह अनेक कर्मचारी आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला. नेवासा शहरातील नागरिकांनी पोलीस पथकाच्या कारवाईचे कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा