खर्डा प्रतिनधी/30एप्रिल2025
खर्डा येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री समर्थ मोटर्स या शोरूमचा उद्घाटन समारंभ सिताराम गडाचे महंत ह भ प महालिंग महाराज नगरे यांच्या शुभहस्ते फित कापून व नारळ वाढवून करण्यात आला.
जामखेडचे S K Group यांच्या सहकार्याने हिरो कंपनीच्या स्प्लेंडर, पॅशन, स्कूटर व विविध कंपनीच्या टू व्हीलर गाड्या या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
श्री समर्थ मोटर्सच्या वतीने मल्टी ब्रँड आउटलेट सर्विस सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना टू व्हीलर च्या सर्विसिंग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यामुळे ग्राहकांचा खर्च व वेळ वाया जाणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन मोटरसायकल घेताना जुन्या गाड्या एक्सचेंज व फायनान्सची सुविधा योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री समर्थ मोटर्सचे प्रो. दत्तराज पवार यांनी सांगितले.
श्री समर्थ मोटर्सच्या उद्घाटन प्रसंगी नवीन गाड्या बुकिंग साठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या कार्यक्रम उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, युवराज आबा गोलेकर, पत्रकार संतोष थोरात, श्वेता गायकवाड, बाळासाहेब शिंदे,धनसिंग साळुंखे, ज्ञानेश्वर इंगोले, तांबोळी भाऊसाहेब, डॉक्टर बिपिनचंद्र लाड, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे,,मुरहरी इंगोले, विशाल दौंड, हर्षद ढाळे, बापू ढगे, सागर गुळवे, सय्यद सर, दादा वडे, कपिल लोंढे, दत्ता भोसले, शिवाजी गवसने सुशील शिंदे, किरण जाधव, नंदकुमार गोलेकर, राजू गोलेकर, अक्षय सुर्वे, अर्जुन गोलेकर, मनोज जोरे घुगे सर, शशिकांत गुरसाळी गुरुराज पवार, गणेश शेठ सोनवणे, इत्यादी सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा