खर्डा प्रतिनधी/३०एप्रिल२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा बस स्टँड समोरून दि. २५ एप्रिल २०२५ रोजी रात्री चोरीची एक घटना घडली आहे. फिर्यादी महेश पोपट वायकर यांची मोटारसायकल चोरट्याने चोरून नेली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की खर्डा बस स्टँड समोरून चोरीला बळी पडलेली मोटारसायकल ही फिर्यादी महेश पोपट वायकर वय ३३ वर्षे धंदा शेती.रा. सोनेगाव ता.जामखेड यांची होती. अज्ञात चोरट्याने दि 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 9.50 वाजता १५,००० रुपये किंमतिची मोटारसायकल नं.एम.एच.16 बी.क्यु.5618 ही खर्डा बसस्टँड समोर लावली असता बसस्टँड समोरून चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मोटारसायकल चोरून नेल्याची घटना खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.तसेच अज्ञात चोरट्याविरुद्ध दि.२९एप्रिल२०२५ रोजी बीएनएस २०२३चे कलम ३०३(२)प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा