जामखेड प्रतिनधी/17 मे2025
मंगल कार्यालयातून नवरीसाठी आणलेली सुमारे चार लाखांहून अधिक किंमतीची सोन्याची दागिने चोरीची घटना जामखेड तालुक्यात घडली आहे. शनिवार दि. 14 मे 2025 रोजी राजेवाडी येथील मातोश्री मंगळ कार्यालयात लग्न समारंभादरम्यान, नवरीसाठी आणलेल्या 75 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा ठेवलेला स्टीलचा डबा चोरट्यांनी चोरून नेल्याची नोंद झाली आहे. ही घटना नवरदेवाचे वडील लघुशंकेसाठी गेले असतानाच घडली, ज्याचा दुरुपयोग करून चोरट्यांनी चोरी केली
फीर्यादी प्रताप कल्याण काकडे, रा. बोर्ले, ता. जामखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या दोन मुलांच्या लग्नासाठी आवश्यक असलेली सोन्याची फॅन्सी गंठण व मनी गंठण असे एकूण 75 ग्रॅम वजनाचे दागिने, ज्याची किंमत सुमारे 3 लाख 75 हजार रुपये होती, चोरीला गेले. लग्नाची सोय केली असलेल्या मंगळ कार्यालयात दुपारी साडेचारच्या सुमारास नवरीसाठी आणलेली सोन्याची दागिने ठेवण्यासाठी डबा ठेवला होता. नवरदेवाचे वडील लघुशंका पाहण्यासाठी गेले असताना, परत आल्यावर डबा गायब असल्याचे लक्षात आले.
मंगल कार्यालयातील नातेवाईकांकडून चौकशी केली असता, सोन्याचा डबा कुठेही सापडला नाही. त्यामुळे त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय लोखंडे यांनी तपास सुरू केला आहे.
कोट
या प्रकाराच्या चोरीमुळे जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मंगल कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उणीव स्पष्ट झाली आहे. लग्न समारंभांमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटनात वाढ होत असल्याने नागरिकांना सर्व मंगल कार्यालयांच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करत आहेत. यामुळे भविष्यातील चोरीच्या घटना टाळण्यास मदत होईल, असे स्थानिक लोकांचे मत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा