पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२१मे२०२५
दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे हे आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती भवनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी राष्ट्रपतींशी सविस्तर संवाद साधला. ३१ मे २०२५ रोजी जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा केला जाणार असून, या सोहळ्यास विशेष उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांनी राष्ट्रपतींना दिले.प्रा. राम शिंदे यांच्या भेटीमध्ये राष्ट्रपती, विधानपरिषदेचे सभापती आणि अन्य महत्त्वाच्या पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चा झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्रातील इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असून, त्यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी राष्ट्रपतींना विशेष उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्यामुळे ही भेट अधिक महत्त्वपूर्ण ठरली आहे.
कोट
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव हा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सोहळा असेल. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीमुळे त्याचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सोहळ्यातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाचा गौरव करण्यात आलेला असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा