आहिल्यानगर प्रतिनधी/२२मे२०२५
अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील विविध प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य पोलीस प्रशासनाने गुरुवारी 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश लागू केले. यानिमित्ताने अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. गेल्या काही काळातील प्रशासनिक पुनर्रचनेचा त्याचा भाग असलेल्या या बदलींमुळे पोलीस दलाचे नेतृत्व नव्याने सज्ज झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोकण विभागात रत्नागिरी, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. सोमनाथ घार्गे यांच्यासोबतच आंचल दलाल यांची रायगड पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. साताऱ्याचे पोलीस अधीक्षकपद तुषार दोशी यांना देण्यात आले आहे, तर नितीन बगाटे रत्नागिरीचे नव्या पोलीस अधीक्षक आहेत. रितू खोकर धाराशिवच्या पोलिस अधीक्षक पदावर नियुक्त झाली आहे.
अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घेतले, तर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. लातूर जिल्ह्याचा नविन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना बनवण्यात आले आहे.
या बदल्यांचा उद्देश जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाची प्रशासनिक कार्यक्षमता वाढवणे व स्थानिक सुरक्षा व्यवस्था बळकट करणे हा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा