आहिल्यानगर प्रतिनधी/२३मे२०२५
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतरू येथील सिंगपोरा भागात काल (२१ मे) झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले.
त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
जवान संदीप गायकर हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. देशसेवेचे व्रत पत्करत त्यांनी अनेक दुर्गम भागांमध्ये कर्तव्य बजावले. मात्र, काल दहशतवाद्यांविरोधात झुंज देताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, आहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा (अहिल्यानगर) येथे आज दि.(२३ मे) आणण्यात येणार आहे. गावात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शहिद गायकर यांच्या पश्चात त्यांचे वडील पांडुरंग गायकर, आई, पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे.
शुक्रवार, २३ मे, २०२५
जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आहिल्यानगरचे सुपुत्र शहीद
Tags
# दुःखद बातम्या
About Unknown
दुःखद बातम्या
Labels
दुःखद बातम्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा