जामखेड प्रतिनधी/२४मे२०२५
नवऱ्या मुलास कॅन्सर व किडनीचा आजार असतानाही त्याच्यासोबत लग्न लावून देऊन फसवणूक केली. तसेच लग्नानंतर बुलेट दुचाकी घेण्यासाठी ३ लाख व प्लॉट खरेदीसाठी २० लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून पतीसह त्याच्या दहा नातेवाईकाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की नळेगाव रोडवरील एसटी कॉलनी भागात असलेल्या एका विवाहितेच्या विरोधात पतीसह दहा नातेवाईकांनी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला असल्याची पोलिसांकडे तक्रार झाली आहे. कॅन्सर व किडनीच्या आजारापासून झालेल्या या फसवणुकीचा प्रकार विशेषच लक्षवेधी आहे.
एप्रिल २०२४ मध्ये आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील तुषार बहिर याच्याशी तिचा विवाह झाला. लग्नानंतर पीडितेला ३ लाख रुपये बुलेट दुचाकी घेण्यासाठी आणि २० लाख रुपये प्लॉट खरेदीसाठी माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकण्यात आला. हे पैसे आणले नसल्यास तिला शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ करण्यात आला. त्यातच तिच्या अंगावरील १३ तोळे सोनं वाजवी कारण न देता काढून घेतले गेले.
लग्नाच्या वेळी नवऱ्याला कॅन्सर व किडनीचा आजार असल्याची खरी माहिती आई-वडील, दिर इत्यादींनी जाणूनबुजून लपवली व युवतीशी फसवणूकीचा विवाह करण्यात आला. दिराने तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. या सर्व गोष्टींच्या तक्रारीवरून गुरुवारी दुपारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पती तुषार कुंडलिक बहिर, कुंडलिक विठठल बहीर, चंद्रकला कुंडलिक बहीर, शुभम कुंडलिक बहीर, अमोल अर्जुन बहीर, सुनिल बाबासाहेब उगले, अकुंश विष्णु उगले (सर्व रा. जामखेड), प्रफुल्ल पंढरीनाथ बहीर, चुलत दीर (रा. नाहुली), बाबासाहेब रामभाऊ उगले, अशोक लेंडे पाटील (दोघे रा.नायगाव ता. जामखेड) या दहा जणांविरुद्ध फसवणूक, छळ, विनयभंगाचा प्रयत्न इत्यादी कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रायपल्ले यांच्या देखरेखीखाली सुरू असून, या प्रकारातील विवाहाचे तेथील संबंध असलेले सर्व साक्ष आता पोलीसांसमोर येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा