आहिल्यानगर प्रतिनधी/२५ मे२०२५
गेल्या काही महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेल्या साबलखेड ते चिंचपुर रस्त्याच्या कामाने परिस्थिती अधिक गंभीर बनवली आहे. मात्र, बीड-अहिल्यानगर महामार्गावरील शेरी येथील पर्यायी पूल अचानक खचल्याने वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ उडाला आहे. या घटनेत कोणतीही दुर्दैवी घटना घडली नसल्याचे निर्देशित करण्यात आले आहे. पोलिसांनी वाहतूक वळवून पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू ठेवली आहे.
आष्टी पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह पोलिस नाईक विकास जाधव, बब्रुवाण वाणी, चालक प्रताप घोडके यांनी त्वरित कारवाई करून वाहतूक पर्यायी मार्गे वळवली आहे. मात्र, बीड-अहिल्यानगर महामार्गावरील कामाची गती कमी होती, त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाला कामाची गती वाढवून महामार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पर्यायी मार्ग
अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक आष्टी - बेलगाव - किन्ही - केरूळ - कडा- आष्टी मार्गे जामखेड व बीड कडे जाणारी वाहतूक कडा - केरूळ - किन्ही - बेलगाव - आष्टी मार्गे चालू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा