खर्डा प्रतिनधी/२६ मे२०२५
मे महिन्यात अवकाळी पाऊसामुळे जात असलेल्या काळोखाने खर्डा गावातील श्री संत सीताराम बाबा गडावर जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी त्या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी केली आहे. विशेषतः वृद्ध महिला आणि नागरिकांना रात्रीच्या वेळी हा मार्ग चालवणे अवघड जात आहे.
गेल्या काही दिवसात गावकऱ्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे पथदिव्यांची सोय झाल्यास भक्तांच्या सुरक्षिततेसाठी मदत होईल, असे ग्रामस्थांना वाटते. खर्डा गावात पहाटेच्या वेळीही सिताराम बाबा गडावर जाण्याची मोठी रीघ लागून राहते, त्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाकडून लवकरच पथदिव्यांची सोय करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा