खर्डा प्रतिनधी/२८जून२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे शनिवार, २९ जून २०२५ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ११ वाजता भुईकोट किल्ल्याकडून सुरू झालेली मिरवणूक बैलगाडीतून ढोल-ताशांच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वरूपात झाली. या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या शिक्षण, आरक्षण आणि समाजातील समतेसाठी दिलेल्या योगदानाला प्रमुख स्थान देण्यात आले.
शाहू महाराजांनी मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि गरीब लोकांच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांनी आरक्षणाचा प्रथमिक आरंभ करणारे पहिले महाराज म्हणून इतिहास घडविला. शिक्षणाला प्रोत्साहन देत 'स्त्री शिकली तर समाज उभा राहतो' या विचाराला प्राधान्य दिले. याबाबत खर्डा गावच्या सरपंच संजीवनी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विशेष अभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज व इतर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त तहसीलदार जयसिंग भैसडे आणि स्वागताध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव उपस्थित होते. डॉ. जाधव यांनी सांगितले की, कोणत्याही महान व्यक्तीला केवळ एका जात किंवा धर्माच्या चौकटीत मांडता येत नाही आणि शाहू महाराजांचे सामाजिक योगदान कधीही विसरले जाऊ नये.
या निमित्ताने जामखेड ग्रामीण विकास केंद्र संस्थेकडून खर्ड्यातील पत्रकारांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, तसेच समाजसुधारक संस्थांच्या मान्यवरांनीही भाषणे केली.
यावेळी खर्डा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ .बिपिनचंद्र लाड,सुनील साळुंखे , विशाल पवार,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, रंजन मेघडंबर, दादासाहेब घायतडक,भिमराव सुरवसे,पत्रकार संतोष थोरात, संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड,किशोर दुशी, बाळासाहेब शिंदे,धनसिंह साळुंखे, धनराज पवार, आशुतोष गायकवाड बाबासाहेब राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा शिंगाणे आणि तुकाराम पवार यांनी तर आभारप्रदर्शन रेश्मा बागवान यांनी केले.
शिवाय, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत कराळे, मंगल शिंगाणे, उर्मिला कवडे आणि अनेकांनी परिश्रम घेतले. राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण, आरक्षण व सामाजिक समतेच्या संदेशाला वाहून नेत या भव्य कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणा दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा