अहिल्यानगर प्रतिनिधी/३०जून२०२५
अहिल्यानगर जिल्ह्यात २८ जून २०२५ रोजी पोलिसांनी देशी आणि विदेशी अवैध दारू विक्री करणाऱ्या विविध ठिकाणी छापे टाकून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. जामखेड, एमआयडीसी आणि नगर तालुक्यातील हॉटेलांवर विशेष पथकाच्या मदतीने ही कारवाई पार पडली. या छाप्यांमध्ये एकूण १,०८,६१९ रुपयांच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेला पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी नेतृत्त्व केले.
जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल साहेबा येथे 1)कैलास नागनाथ साळुंके रा. .जामखेड व राजेंद्र रामभाऊ देवकाते रा.शिवूर ता.जामखेड यांच्याकडून ₹३७,४६० किमतीचा दारू साठा जप्त झाला. 2)हॉटेल तांबे खर्डा रोड जामखेड येथून ज्ञानेश्वर रणजित तांबे रा बोराटेवस्ती जामखेड याच्याकडून ₹१६,८५४ देशी विदेशी दारू साठा जप्त केला 3) हॉटेल कावेरी बीड रोड कान्हू पात्र जामखेड येथून मोहित ज्योती पवार याच्याकडून ₹५,०८० किमतीचा साठा मिळाला.
तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल नॅशनलमधून आशिष अशोक रामनानी याच्याकडून ₹१५,७२५ किमतीचा दारू जप्त झाला. नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल आदित्य येथे लक्ष्मण दशरथ साळुंके याच्याकडून ₹३३,५०० किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला.
या सर्व प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करण्याचा इरादा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. विशेष पथकात पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्यासह पोसई राजेंद्र वाघ, सफोदील शकील शेख, पोहेकॉ. शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले व अन्य अधिकारी सहभागी होते. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायकांचे धाबे दणाणले आहेत.
सोमवार, ३० जून, २०२५
Home
dysp संतोष खाड़े
जामखेड, एमआयडीसी, नगर तालुक्यात दारू माफियांवर विशेष पथकाची धडक कारवाई ; 1,08,619 रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त , 6 आरोपी ताब्यात
जामखेड, एमआयडीसी, नगर तालुक्यात दारू माफियांवर विशेष पथकाची धडक कारवाई ; 1,08,619 रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त , 6 आरोपी ताब्यात
Tags
# dysp संतोष खाड़े
About Unknown
dysp संतोष खाड़े
Labels
dysp संतोष खाड़े
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा