जामखेड प्रतिनधी/४जुलै२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील धनेगाव येथील धाकटी पंढरी हे आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षी, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणी महापुजा करण्यात येनार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रतापजी सरनाईक, मंत्रालयीन सचिव कृष्णा जाधव, अहिल्यानगरचे एस. पी. सोमनाथ घार्गे, आमदार रोहित पवार, प्रा.सचिन सर घायवळ,भाजपा नेते प्रा. मधुकर राळेभात, अमोल राळेभात, मंगेश आजबे आणि ठाणे येथील शिवसेना नेते राजेंद्र फाटक या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
धनेगाव परिसरातील भाविकांबरोबरच मुस्लीम समुदायही या भक्ती सोहळ्यात उत्साहाने सहभागी होतो. या दिंड्यांसाठी विविध ठिकाणांहून भाविकांची गर्दी होते. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समीतीचे अध्यक्ष आणि सर्व संचालकांनी भाविकांना उपस्थित राहण्याचे खास आवाहन केले आहे.
गेली ४० वर्षांपासून, धनेगाव येथे हभप रमेश महाराज साबळे हे तिंत्रज या ठिकाणाहून दिंडी घेऊन येतात, ही परंपरा चालवण्यात येत आहे. या वर्षी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यात होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा