खर्डा प्रतिनधी /5 जुलै2025
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाण्यासाठी जी मोठी गर्दी जमते, त्या वेळी पंढरपूरला जाऊ शकणार नाहीत अशा भाविकांसाठी खर्डा व नान्नज परिसरातून मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. प्रा. सचिन सर गायवळ यांनी गेली तीन वर्षापासून धाकटी पंढरी असलेल्या धनेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात जाण्यासाठी मोफत लक्झरी बससेवा सुरू केली आहे. या बससेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना आता पायपीट करण्याची गरज नाही.
धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. परंतु अनेक भाविकांना पंढरपूरच्या दर्शनासाठी गर्दीमुळे जाता येत नाही, त्यामुळे पंढरपूर नंतर धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला धाकटी पंढरी समजले जाते. त्यामुळे जामखेड तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक गावातील महिला व भावीक भक्त येथे दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या निमित्ताने उपवास धरून दर्शनासाठी येत असतात. परंतु एस.टी. महामंडळाच्या बस या खर्डा व नान्नज या ठिकाणीच येत असतात त्यानंतरचा 15 किलोमीटरचा प्रवास भाविकांना खाजगी वाहन, मोटरसायकल किंवा पायी चालत जावून करावा लागत होता.
या बाबत प्रा.सचिन सर गायवळ यांनी याचे गंभीर्य ओळखून गेली तीन वर्षापासून नान्नज या गावातून येथील परिसरातील लोकांसाठी दोन लक्झरी बस सेवा व खर्डा येथील बस स्थानकापासून धाकटी पंढरी असणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 4 चार बस तर नान्नज ते धनेगाव 2 लक्झरी बस अशा एकूण सहा लक्झरी बससेवा भाविक भक्तांसाठी सुरू केल्या आहेत.
प्रा. सचिन सर गायवळ हे गेली काही वर्षे गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, तिळगुळ वाटप, शालेय साहित्य वाटप, दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे टँकर, कोरोनाच्या काळात रुग्णांना आरोग्य सेवा इत्यादी सामाजिक कार्य करत आहेत.दि 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नान्नज व खर्डा बस स्थानका समोर मान्यवरांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ होणार आहे.
तसेच जामखेड तालुक्यातील वयस्कर पुरुष, महिला लहान मुले यांना या मोफत बससेवेमुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी मोठा लाभ होत असल्याने भाविक भक्तांकडून आनंद व्यक्त करून प्रा.सचिन गायवळ यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा