जामखेड प्रतिनधी/१३जुलै२०२५
महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिलेदार अहिल्यानगर जिल्हा मंजुर फेडरेशनचे माजी संचालक मनोज (काका) कुलकर्णी यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषद सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल सिध्दीविनायक प्रतिष्ठान व परशुराम प्रतिष्ठान च्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मनोज काका कुलकर्णी म्हणाले कि, ईतके वर्षे पक्षाची सेवा प्रमाणीक पणे केल्यामुळे पक्षाने महाराष्ट्राराज्याच्या कार्यकारणीमध्ये स्थान देऊन काम करण्याची संधी दिली व हे जे पद दिलेले आहे यामुळे माझ्यावर जबाबदारी देखील वाढलेली आहे त्यामुळे या पदाचा उपयोग सर्व समाजाच्या हितासाठी व समाजातील प्रत्येक घटकासाठी करेन व आपल्या कुठल्याही अडचणीत आपल्या पाठीशी न राहता तुमच्या सर्वांसोबत असेन असे आश्वासन या वेळी दिले व सर्वांचे आभार मानून थोर मोठ्यांचा आशिर्वाद घेतला. या वेळी सुंदर काका देशमुख , कल्याणराव घायाळ देवा, बंडू काका जोशी , कांता कुलकर्णी, रवींद्र किंबवणे, रोहित देशमुख, सचिन देशमुख, विजय कुलकर्णी, गणेश जोशी, प्रमोद गाणी , सुहास देशमुख, राघवेंद्र कुलकर्णी आदी समाज बा़धव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा