कोपरगाव प्रतिनिधी | २३ ऑगस्ट २०२५
आहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर मागील "बालाजी आंगण" परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते हुसेन सय्यद यांनी या संदर्भातील माहिती थेट कोपरगाव पोलिस स्टेशन व काही सामाजिक संघटनांना दिली असून, अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे.
या प्रकारामुळे परिसरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, युवकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. “अशा बेकायदेशीर आणि अश्लील व्यवसायाला कोणत्या आकाचा पाठिंबा आहे?” असा प्रश्न आता स्थानिकांमध्ये चर्चेत आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यवसायासाठी बाहेरून आलेल्या काही महिलांना खोट्या नातेसंबंधाच्या आधारावर फसवून यात गुंतवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा संपूर्ण उपद्रव स्थानिक पातळीवर एका गटाच्या देखरेखीखाली होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात लवकर गांभीर्याने चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही, तर नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या घटनेमुळे कोपरगावमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाकडून तातडीने आणि काटेकोर पावले उचलली जाण्याची मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा