खर्डा प्रतिनधी/२४ ऑगस्ट२०२५
आज दि 24 ऑगस्ट रोजी खर्डा येथे सामाजिक कार्यकर्ते सुहास मदने यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पत्रकारांना डायरी आणि पेन वाटप करण्यात आले.
खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी पत्रकार आणि पोलिस यांच्यात सुसंवाद आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी पत्रकारांचा सन्मान राखण्यास सतत प्रयत्न केले असल्याचा उल्लेख केला. "मी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये रुजू झाल्यापासून कोणताही वाद नाही, आम्ही चांगल्या सहकार्याने काम करत आहोत," असे त्यांचे म्हणणे होते. पत्रकार हे सामाजिक उपक्रमांवर लक्ष देऊन प्रामाणिक बातम्या देत असल्यामुळे हे सहकार्य अधिक महत्वाचे ठरणार आहे, असे त्यांनी सुहास मदने यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले .
सामाजिक कार्यकर्ते सुहास मदने यांनी पत्रकार सन्मानाच्या कार्यक्रमात पेन, डायरी आणि पुष्पगुच्छ देखील दिले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील गोलेकर, वैभव जमकावळे, कांतीलाल डोके, सिताराम जावळे, लष्करे सर, अरविंद गुजर, रशीद बागवान तसेच खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात, पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, पत्रकार दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे,रिजवान बागवान, किशोर दूशी, धनसिंग साळुंखे, आशुतोष गायकवाड, गणेश ढगे, सचिन सुरवसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार रिजवान बागवान यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार बाळासाहेब शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार दत्तराज पवार यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा