खर्डा प्रतिनधी/२५ऑगस्ट२०२५
खर्डा येथील मुस्लिम समाजाने गणेश विसर्जनानंतर ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा ठराव घेतला आहे.दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी ११.३० वाजेच्या दरम्यान खर्डा पोलीस स्टेशनवर खर्डा शहरातील मस्जिद ट्रस्टी, मौलाना आणि मुस्लिम समाजाच्या नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरले की, ईद-ए-मिलाद निमित्ताने या वर्षी कोणतीही मिरवणूक न काढता, मस्जिदमध्ये नमाज पठण केली जाईल. मुस्लिम समाजाने हिंदू धर्मातील गणेशोत्सव पवित्र सण म्हणून सन्मान देत, त्यांना अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांचा सण आनंददायी होण्यासाठी मिरवणूक दि.८ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनानंतर काढण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी केले असून त्यांनी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक ऐक्य कायम ठेवण्याचा आवाहनही केले आहे.
या निर्णयाद्वारे धार्मिक सणांच्या काळात परस्पर आदर व सहिष्णुता वाढवण्याचा खर्डा येथील मुस्लिम समाजाचा प्रयत्न दिसून येतो. मुस्लिम समाजाने गणेशोत्सवात कोणताही व्यत्यय न बसेल याची काळजी घेतली आहे, ज्यायोगे खर्डा परिसरातील शांतता आणि सामाजिक सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहील. हिंदू-मुस्लिम सलोख्याचा यामुळे एक आदर्श उदाहरण समोर आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा