जामखेड प्रतिनिधी / २२ सप्टेंबर २०२५
जामखेड तालुक्यात काल (रविवार, दि. २१ सप्टेंबर) रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून पूरस्थिती गंभीर बनली आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. अनेक घरांत पाणी शिरले तर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांनी भीतीत रात्र जागून काढली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भुतवडा–लेहनेवाडी पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. काही कॅनल फुटल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. भुतवडा रस्ता परिसरातील घरांत पाणी घुसले असून रात्रभर नागरिक त्रस्त झाले. खर्डा, बालाघाट आणि जातेगाव परिसरात पावसाचा जोर अधिक असून ग्रामपंचायत कार्यालयासह घरे पाण्याखाली गेली आहेत.दिघोळ येथे रात्री ढगफुटी झाली व संपूर्ण गावात पाणी साचले. सावता दगडे यांचे घर तसेच विधाते वस्तीजवळील मंदिर पाण्याखाली गेले आहे. मांजरा नदीला पूर आल्याने पाणी पात्राबाहेर वाहू लागले असून नागरिक दहशतीत आहेत.
खर्डा भागातील कौतुका नदीला महापुर आला आहे. गोलेकर लवण येथील ओढ्यावर पूर आल्याने वाहतूक बंद झाली. दरडवाडी पुलाचा कठडा तुटला आहे. खैरी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून सकाळी ४.३० वाजता सांडवा विसर्ग ११,७४५ क्युसेक्स इतका झाला आहे.
नदीकाठावर वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर बुद्रुक, पांढरेवाडी, जातेगाव आणि शेळगाव या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवून घ्यावे व पुरापासून बचावासाठी खबरदारी घ्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
शेती व जनजीवनावर परिणाम
मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. घरे आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रतिक्रिया – सभापती प्रा. राम शिंदे
या गंभीर पूरस्थितीत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीचे निर्देश दिले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया, गुजरात NDRF प्रमुख आर. के. शर्मा व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रमुख चव्हाण यांच्याशी थेट समन्वय साधला असून आवश्यक पथके जामखेडकडे रवाना झाली आहेत.
“पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी, घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले आहे
सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५
Home
सामजिक बातम्या
जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; सभापती प्रा. राम शिंदे यांचे आवाहन – "घाबरू नका, प्रशासन सज्ज आहे"
जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; सभापती प्रा. राम शिंदे यांचे आवाहन – "घाबरू नका, प्रशासन सज्ज आहे"
Tags
# सामजिक बातम्या
About Unknown
सामजिक बातम्या
Labels
सामजिक बातम्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा