जामखेड प्रातिनधी/२९ सप्टेंबर२०२५
जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथील काळे वस्तीवरून जामखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला असून ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सागर टाकले व गावातील नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देत तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.समस्याग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, या पुलाच्या वाहून गेल्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यास, तर कामानिमित्त रोजंदारीसाठी जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांची हालअपेष्टा सुरू आहेत.ग्रामस्थांचे सामजिक कार्यकर्ते सागर टकले यांनी सांगितले की, "गावकऱ्यांना अगदी मूलभूत गरजा भागवण्यासाठीही मोठ्या कष्टाने प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी."मागणीग्रामस्थांच्या वतीने नगरपरिषदेकडे पूल दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. हा मार्ग ग्रामस्थांसाठी महत्वाचा असल्याने, वाहून गेलेला पूल लवकरात लवकर उभारावा आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी विनंती सामजिक कार्यकर्ते सागर टाकले व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा