जामखेड प्रतिनिधी/२८सप्टेंबर२०२५
जामखेड तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अलीकडील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची पिकं, जनावरांचा चारा, घरं-दारं व जीवनावश्यक साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हा अन्नदाता असून तोच राष्ट्राचा भाग्यविधाता आहे. या कठीण प्रसंगात शेतकऱ्यांसोबत उभे राहण्यासाठी श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती व श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान जामखेड तालुक्याच्या वतीने मदत संकलन अभियान सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमात नागरिकांना फक्त जीवनावश्यक किराणा साहित्य स्वरूपातच मदत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पैसे स्विकारले जाणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना आयोजकांनी केली आहे. तांदुळ, गहू, ज्वारी, साखर, रवा, बेसन, डाळी, तेल, साबण आदी साहित्य स्वरूपात मदत स्वीकारली जाणार आहे. या मदतीच्या माध्यमातून पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यास हातभार लावण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.
साहित्य जमा करण्याची ठिकाणे जामखेड शहरात विविध ठिकाणी निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये जे.एस. टेलर्स, साई झेरॉक्स, दुर्गा कम्युनिकेशन, श्री सिद्धिविनायक फिल्टर्ड वॉटर सेंटर यांचा समावेश आहे. धर्मवीर संभाजी महाराज मार्गावरील तहसील पटांगणासमोर तसेच बीड रोड कॉर्नर, तपनेश्वर रोड आदी ठिकाणी साहित्य स्वीकारले जाणार आहे.
यासाठी संबंधित व्यक्तींना संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जे. एस. टेलर
📞 ९५५२९३९३४७
साई झेरॉक्स
📞 ८८०६८००८६५
दुर्गा कम्युनिकेशन
📞 ९२२६१३१०७२
श्री.सिद्धिविनायक फिल्टर्ड वॉटर
📞 ९४२३४६१०४४
या मदत उपक्रमाच्या समन्वयासाठी श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती व श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान, जामखेड तालुका संपर्क – पांडुरंग मधुकर भोसले (मो. ९२०९९४५७८७) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांनी व संस्थांनी केलेले हे मदत आवाहन लोकसहभागातून अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. "एक छोटीशी मदत, जमेल तशी... जमेल तेवढी..." या घोषवाक्याखाली उभारण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा