जामखेड प्रतिनिधी /६ सप्टेंबर२०२५
जामखेड शहरातील शिवाजी नगर भागात एका पंधरा वर्षाच्या मुलीने आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्याचे कारण समजु शकले नसुन या प्रकरणी मुलीचे चुलते यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. यावरुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरात सध्या गणेश उत्सवाची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे दि ५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मयत भक्ती गणेश गायकवाड वय १५ वर्षे, रा. शिवाजीनगर, जामखेड या मुलीने आपल्या रहात्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तीला तातडीने जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पुर्वीच तीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर तीच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आहे. मयत भक्ती गायकवाड ही इयत्ता नववी मध्ये शिकत होती. तीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी मयत मुलीचे चुलते मोहन विनायक गायकवाड, वय ३६ वर्षे रा. मोहा. यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी वरुन जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो.ना.जितेंद्र सरोदे हे करीत आहेत.
एवढ्या कमी वयात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा