खर्डा प्रतिनधी/६" सप्टेंबर२०२५
आज दि ६ सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी खर्डा शहरातील ऐतिहासिक आणि पुरातन बारव परिसरात पाण्यात बुडालेल्या बारव गणपतीची दरवर्षीप्रमाणे महाआरती उत्साहाने पार पडली. पारंपरिक विधिनुसार ब्राह्मणांच्या हस्ते पूजा संपन्न झाल्यानंतर, खासकरून पत्रकारांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली, ज्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मोठ्या कौतुकानं स्वागत केले.
खर्डा व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गणपती बाप्पा मोरया”च्या भक्तिमय गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या बारवमधील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वर्षानुवर्षे भाविकांची गर्दी होते. यंदाही गावातील सर्व मंडळे, ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला.यावेळी उपस्थित पत्रकार संतोष थोरात, संपादिका श्वेता गायकवाड, अनिल धोत्रे, बाळासाहेब शिंदे,धनसिंग साळुंखे आयोजक ग्रामपंचायत सदस्य महालींग कोरे,गणेश शिंदे,राजू मोरे, , संतोष लष्करे,शेखर देशमुख,यूसुफ बागवान,शुुुशील शििंदे,नीरज इगळे, प्रशांत पानगावकर ,अशोक कणसे, प्रतिक गोरे ,भगवान नाळे व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा