खर्डा (प्रतिनिधी): २७सप्टेंबर
लोकप्रतिनिधी म्हणून सदैव समाजाशी घट्ट नाळ जोडून कार्य करणारे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातीवर खर्च न करता प्रत्यक्ष समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. या संकल्पाचा भाग म्हणून आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी खर्डा येथे पूरग्रस्त कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन आर. व्ही. पॉयेमर्सचे मालक विशाल यांनी केले होते. त्यांच्या तर्फे मैत्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर गवसने मराठा यांनी पुढाकार घेतला.
पूरग्रस्त कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप जामखेड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह (अण्णा) गोलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील अलीकडील झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थितीत अनेक कुटुंबांचे हाल झाले. अशा परिस्थितीत किराणा साहित्याचे वाटप झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उपक्रमातून जाहिरातबाजीपेक्षा प्रत्यक्ष समाजोपयोगी कार्यालाच प्राधान्य देणे गरजेचे असल्याचा संदेश दिला गेला. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेले हे उपक्रम भविष्यातील जनसेवेचे दिशादर्शन करणारे ठरले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा