जामखेड प्रतिनिधी/१५ ऑक्टोबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, जामखेड तालुका यांच्या वतीने "गुणगौरव सोहळा" हा प्रेरणादायी कार्यक्रम महावीर मंगल कार्यालय, नगर रोड, जामखेड येथे आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्यात जामखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मा. रोहित (दादा) पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मेहनती व विविध पदांवर केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या गौरवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, जामखेड तालुक्याच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे .
कार्यक्रमाचा उद्देश असा की गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरवस्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५वेळ: दुपारी २:०० वाजता महावीर मंगल कार्यालय, नगर रोड, जामखेड येथे होणार आहे.
तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन झाले असून, समाजातील उत्कृष्ट व्यक्तिमत्वांना सन्मान मिळून नव्या प्रेरणेचा संचार होईल. सर्व नागरिकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, जामखेड तालुका यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा