जामखेड प्रतिनिधी : १३ सप्टेंबर
जामखेड करमाळा रस्त्यावरील एका हॉटेलवर विजय महादेव वाळुंजकर ( वय २४ ) या तरुणाचे आकस्मित निधन झालं आहे. सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर झाला घटनेचा उलगडा. याबाबत हकीगत अशी की, सोमवारी दि १२ ११:३० वाजताच्या विजय महादेव वाळुंजकर हा आपले जवळा येथून पुण्याला जाण्यासाठी निघाला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ( दि . १३ ) सकाळी ६:०० वाजता त्याने आपल्या मित्राला फोन केला की, माझ्या छातीत दुखत आहे. मला लवकर दवाखान्यात घेऊन चला. मात्र त्यास योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले.
सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची रुग्णवाहीका घेऊन समक्ष घटनास्थळी दाखल झाले . व त्यास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ . शशांक वाघमारे यांनी विजय वाळुंजकर यास मृत घोषीत केले . या घटनेची खबर अजित महादेव वाळुंजकर यांनी दिली . पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत तपास करत आहेत . रजी नंबर ५२/२०२२ , सी.आर.पी. सी १७४ प्रमाणे दि . १३ / ९ / २०२२ प्रमाणे दाखल झाले आहे
अधिक माहिती अशी की, मयत विजय हा जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी शिवारातील रसिका हॉटेल येथे काल रात्रभर झोपलेलो होता. उठल्यापासून त्याचे छातीत दुखत होते. मला लवकर दवाखान्यात घेवून जा तो म्हणाला होता. यानुसार विजयाच
भाऊ रसिका हॉटेल चुंभळी येथे गेले त्यावेळी रसिका हॉटेल जवळ तो मिळून आला व त्याचे आजूबाजूस लोक जमा झालेले होते . त्यानंतर आम्ही भाऊ - विजय याचे जवळ जावून त्याची खात्री केली असता तो काहीएक बोलत नव्हता तो सुन्न अवस्थेत पडलेला होता म्हणून आम्ही अॅम्बूलन्स ला फोन करून बोलावून घेवून त्यास सरकारी दवाखाना , जामखेड येथे औषधोपचार कामी अँडमिट केले असता डॉक्टरांनी त्यास तपासले विजय महादेव वाळूंजकर हा औषधोपचार पुर्वीच मयत झाला आहे.
No comments:
Post a Comment