खर्डा प्रतिनिधी : १४ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक प्रलंबित कामे करण्यासाठी सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला असून यातून मोठ्या प्रमाणात कामे होणार आहेत. तसेच कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामे पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पसरले आहे.
खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दूरावस्था झाली होती. या रस्त्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून खर्डा येथील सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी मोठा निधी मंजूर करून आणला व काही रस्त्यांची काम पूर्ण केली तर काही प्रगतीपथावर आहेत.
सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी खर्डा पंचक्रोशीतील गावासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणल्याने लवकरच आपल्याला खर्डा व परिसरात रस्त्याची मोठी कामे पूर्ण झालेली दिसतील असे चित्र आहे.
खर्डा पंचक्रोशीतील विकास कामांसाठी सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून २५ /१५ योजने अंतर्गत दरडवाडी रस्त्यासाठी २५ लाख, दरडवाडी येथील दलित वस्तीसाठी ८ लाख, कॉंक्रिटीकरण रस्ता जिल्हा परिषद शाळा, गाव ते मारुती मंदिर असे काम चालू आहे. मारुती मंदिर ते केकान वस्ती २५/१५ अंतर्गत १५ लाख रुपये, पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळा ते लोकरे वस्ती २५/१५ अंतर्गत १२ लाख रुपये निधीतून काम चालू आहे. पांढरेवाडी येथे मातोश्री पानंद रस्त्या चे दीड किलोमीटर खडीकरण व मुरमीकरण करण्यासाठी ३८ लाख रुपये असा रस्ता मंजूर करून आणला, त्याचेही काम चालू आहे. गवळवाडी दलित वस्ती अंतर्गत ८ लाख रुपये काँक्रिटीकरण रस्ता, जिल्हा परिषद शाळा हनुमान मंदिर २५/१५ अंतर्गत ५ लाख निधी काम चालू आहे. नागोबाची वाडी दलित वस्ती कॉंक्रिटीकरण रस्ता ५ लाख व काम पूर्ण, तांडा वस्ती योजने अंतर्गत कडावस्ती ते मारुती मंदिरासमोर काँक्रिटीकरण करणे २ लाख रुपये, मोरवस्ती कॉंक्रिटीकरण करणे २ लाख, गंजपीररवस्ती मारुती मंदिरासमोर काँक्रिटीकरण करणे २ लाख, एमआरजीएस योजने अंतर्गत नागोबाचीवाडी बारगजे वस्ती ऑल कंपाऊंड १४ लाख रुपये, बारगजे वस्ती येथे शाळेसमोर काँक्रिटीकरण रस्ता ३ लाख रूपये, २५/१५ अंतर्गत बारगजे वस्ती सभामंडपासाठी १५ लाख रुपये, हे काम प्रगतीपथावर आहे. मुंगेवाडी दलित वस्ती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ते मेन रोड काँक्रिटीकरण रस्ता पूर्ण ९ लाख कॉंक्रिटीकरण (२५/१५ अंतर्गत) , खर्डा गावासाठी दलित वस्ती अंतर्गत ६० लाख रुपये एलईडी लाईट मंजूर केलेली आहे. अशी कोट्यावधी रूपयांची विकास कामे मंजूर करून खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील विकासाची मोठी जबाबदारी सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी पार पाडली आहे. अशाप्रकारे पंचक्रोशीतील खर्डा हे गाव खरंच विकासाच्या मार्गाने चाललेले दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा