जामखेड प्रतिनिधी -७ जानेवारी
पोलीस आणि पत्रकार हे समाजसेवकच आहेत. पोलीस आणि पत्रकारांच्या भुमिकेमुळे समाजातील अनिष्ट प्रवृत्तीला अंकुश ठेवला जातो.पोलिस हे अधिकाराने काम करतात त्यांचे ते कर्तव्यच आहे, परंतु पत्रकार हे आपले काम सांभाळून समाजसुधारण्याच्या माध्यमातून कार्यरत असतात.त्यामुळे समाजाच्या विकासाला गती मिळते, असे मत पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेड तालुका यांच्यावतीने दैनिक प्रभात कार्यालयात पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुप्षहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष लियाकत शेख,जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दीपक देवमाने,सचिव ओंकार दळवी,शिवाजी इकडे,सचिन अटकरे,समीर शेख,रामहरी रोडे,रिजवान शेख,संदेश हजारे,विजय राजकार,तानाजी पवार,शंकर कुचेकर,नालासापोरा येथील सहायक पोलीस निरीक्षक तात्यासाहेब सावंत ,हेड कांस्टेबल भगवान पालवे आदींसह पत्रकार उपस्थित होते
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले कि आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या निर्भीड व नितीमुल्य जपणाऱ्या पत्रकारितेचा वसा आणि वारसा आजच्या काळातही जपणे गरजेचे आहे. समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. आणि त्यांचे काम समाजाला प्रेरक असते. आपल्या संघाच्या पत्रकाराकडुनच ते काम होत असल्याबाबतचे गौरवोद्गार गायकवाड यांनी काढले.यावेळी दीपक देवमाने,लियाकत शेख,प्रकाश खंडागळे यांची भाषणे झाली आभार पत्रकार ओंकार दळवी यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा