खर्डा प्रतिनधी : ७ जानेवारी
मुक्या जनावरांना चारा व भुकेल्या मानसाला अन्न हे दान सर्वात श्रेष्ठ आहे. ते केल्याने संपत्ती कमी होत नाही तर वाढते असे प्रतिपादन वेदशास्त्री कपिलशास्त्री कविश्वर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिंपी गल्ली येथील संत नामदेव महाराज मंदिर सभामंडप येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा सोहळा श्रीमान ताई महाराज यांच्या कृपेने मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या भजनाने कार्यक्रमाचा परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन खर्डा पंचक्रोशीतील भक्तगण व परशुराम सेवा संघ खर्डा यांच्या वतीने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सात दिवस चाललेल्या भागवत कथा ऐकण्याचा भक्तीमय आनंद हाजारो भावीकभक्तानी घेतला. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्री भागवत ग्रंथ मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. समाप्ती दिवशी लोकवर्गणीतून हाजारो भावीकांना मिष्टान्न भोजन दिले. खर्डा परशुराम सेवा संघाच्या वतीने कथा श्रवण करणाऱ्या भावीकाना रोज दुपारी मसाला दूध देण्यात येत होते.
खर्डा येथील ग्राम जोशी व लांडगे परिवाराने उत्कृष्ट पद्धतीने पौरोहित्याचे कर्तव्य बजावले.पंचक्रोशीतील भक्तगण व परशुराम सेवा संघ खर्डा यांच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा